(तालुक्यातुन अमरावती पर्यंतचा मोठा रॅकेट सक्रीय !—–)
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

प्रतिकात्मक फोटो
अकोला:- बोरगाव येथील गुटखा माफियाचे मोठे जाळे सध्या अकोला जिल्हातील मुर्तिजापुर तालुका व अकोल्यातील काही भागातील कार्यरत असुन हे रॅकेट संपुर्ण तालुका तसेच अमरावतीच्या हद्दीपर्यंत नकली गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची धकादायक माहिती समोर आली आहे.
सुत्रांच्या माहिती नुसार बोरगाव आणि माना येथुन दररोज तब्बल ७० ते ८०पोत्यांचा गुटखा विक्रीसाठी बाहेर पाठवला जात आहे. विशेष म्हणजे अमरावतीतील कुख्यात गुटखा माफिया जावेद याचा या व्यवहारामध्ये हात असल्याची माहितीही पुढे आली आहे. तो नकली गुटखा विक्री करत असुन, त्याची पॅकींग बोरगाव येथून वितरीत होते.असे बोलले जात आहे.
बोरगाव पोलीस स्टेशन, मुर्तिजापुर ग्रामीण व शहर पोलीस ठाणे तसेच माना पोलीस ठाण्या अंतर्गत व्यापार करत असुन यावर एकही कारवाई का होत नाही, तर सुत्रांच्या मते या भागातील अन्न व औषध आणि अधिकारांचे माफियाशी साटेलोटे असल्याचा संजय व्यक्त होत आहे.
असे असतांना, अकोला स्थानिक गुन्हे शाखेला सर्व माहिती असुन ही अध्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या निष्क्रीयतेमुळे गुटखा माफियांचे मनोबल अधिकच वाटले आहे.
या नकली गुटख्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील तरूण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असुन, सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन या प्रकरणी तात्काळ लक्ष घालुन कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



