नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अशोक चराटी भाजपचा झेंडा खाली ठेवणार काय ?

आजरा येथील पत्रकार परिषदेत परशुराम बामणे यांचा सवाल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- तानाजी भोकरे

आजरा:- माजी नगरसेवक अशोक चराटी यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा झेंडा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे चराटी हे भाजपचा झेंडा खाली ठेवणार काय असा सवाल उपस्थित करत आबिटकर आपला झेंडा देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणार काय असा सवाल अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
बामणे म्हणाले, सुरवातीला नगरपंचायतीच्या कारभारा विरोधात दाद मागायला कोण तयार नव्हते. आंदोलनातून अन्यायी कर कमी केला. आबिटकरांचा अर्ज भरण्यापासून आम्ही होतो. शहरासाठी आबिटकरांनी निधी दिला. परंतु सत्ताधा-यांनी गैरवापर केला.निधीचे नियोजन नसल्याने आबिटकरांचे नाव बदनाम होत आहे.
विजय थोरवत म्हणाले, पाणी व्यवस्था नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. सत्तेत असलेल्या नेत्यांचे दुर्लक्ष आहे. वाय बी चव्हाण म्हणाले, अंधाधूंद कारभार नगरपंचायतीचा सुरू आहे. पाण्याचा ठेका अनुभवी ठेकेदाराला दिला असता तर सर्व प्रश्न सुटले असते.
यावेळी पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, जावेद पठाण, दयानंद भोपळे, जोतिबा आजगेकर,दिनकर जाधव, गौरव देशपांडे आदी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:08 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!