नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांचे आरोग्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन….

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी:-साकिब सय्यद

पिंपळनेर:- धुळे जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी योग शिक्षकांनी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद मार्फत आरोग्यवर्धिनी योगशिक्षकांची योगसेवा सर्व तालुक्यात मागील पाच सहा वर्षांपासून सुरू होती. सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात योगशिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक केली होती. त्यांच्या नियमित योगसत्रामुळे नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होऊन शासनाचा आस्थापनाचा व औषधींचा खर्च कमी होत होता व योगशिक्षकांनाही रोजगार मिळत होता व योगाचा प्रचार व प्रसार ही वाढत होता. परंतु यावर्षी एप्रिल पासून शासनाने काहीही कारण न देता अचानक हे योगसत्र बंद केले आहे. तसेच थकित मानधन ही दिले नाही. त्यामुळे योगशिक्षकांचा रोजगारही बुडाला आहे व मानधन थकीत झाल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये महिला योगशिक्षकांची संख्या जास्त असून त्यात गरीब, विधवा व परित्यक्ता महिलांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर धुळे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षा मनिषा चौधरी व योगशिक्षिका मंगला पाटील,मीनाक्षी बारी, शिलू खरे (पिंपळनेर) मनिषा सोनवणे आदी उपस्थित होते.
दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी निवेदन वाचून लवकरच याबाबीकडे लक्ष्य देऊन समस्या दूर करू असे आश्वासन दिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:43 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!