नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ऑनलाइन पार्सल डिलिव्हरी बॉयकडून १६.२८ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर :- शहरातील शिवाजी पेठ परिसरात घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयिताला जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत पकडले. संशयिताकडून १६ लाख २८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन पाटल्या आणि गंठणासह गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपये किमतीची मोपेड, असा एकूण १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
शुभवा सुरेश मंडलीक (वय ६३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांच्या घरात १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी चार ते पावणेपाचच्या दरम्यान चोरी झाली. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून उघड्या असलेल्या तिजोरीतील सोन्याच्या सहा तोळे वजनाच्या पाटल्या आणि पाच तोळे वजनाचे गंठण चोरून नेले. या दागिन्यांची एकूण किंमत १६ लाख २८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे आणि पथकाने शिवाजी पेठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून संशयिताची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली.पूर्वी ऑनलाइन पार्सल डिलिव्हरीचे काम करणारा सोहेल समीर शेख हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी अंबाई टँक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला.संशयित पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून अंबाई टँक परिसरातून येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता मोपेडच्या डिक्कीत रुमालात गुंडाळलेल्या सोन्याच्या दोन पाटल्या आणि गंठण आढळून आले. अधिक चौकशीदरम्यान त्याने हे दागिने शिवाजी पेठ परिसरातील एका घरातून चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.या कारवाईत पोलिसांनी ५७.२६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, ज्यांची किंमत आठ लाख ८८ हजार रुपये आहे, तसेच ४८.६८० ग्रॅम वजनाचे काळ्या मण्यांसह सोन्याचे गंठण, ज्याची किंमत सात लाख ४० हजार रुपये आहे, असा एकूण १६ लाख २८ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज हस्तगत केला. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची होंडा एव्हिएटर मोपेडही जप्त करण्यात आली.या प्रकरणी सोहेल समीर शेख (वय २८, मूळ रा. नवी नाना पेठ, पुणे; सध्या रा. चोपडे मळा, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताविरुद्ध पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये २०२६ मधील गुन्हा क्रमांक ०४/२०२६ हा भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३(३) अन्वये, तर २०२३ मधील गुन्हा क्रमांक ०३/२०२३ हा भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर, प्रशांत घोलप, प्रवीण सावंत आणि पोलीस अंमलदार योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विनोद कांबळे, योगेश लोकरे, स्वप्निल कांबळे व मोहन लगारे यांनी ही कारवाई केली.
अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणून संपूर्ण सोन्याचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत केल्याने जुना राजवाडा पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 am, October 22, 2026
30°C
घनघोर बादल
46 %
14 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:28 am
Sunset: 6:01 pm
Translate »
error: Content is protected !!