नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कर्जत पोलिस ठाण्यातील वादग्रस्त पोलिस हवालदार हर्षद जमदाडे ह्याची अलिबाग येथे उचलबांगडी.


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- जयेश जाधव

कर्जत:- कर्जत पोलिस ठाण्यातील वादग्रस्त पोलिस हवालदार हर्षद जमदाडे (बक्कल नं .९९७) ह्याची अलिबाग येथे उचलबांगडी करण्यात आली आहे . याबाबतचे लेखी आदेश पोलिस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी काढले आहे.
पो. हवालदार हर्षद जमदाडे ह्याची नेमणूक कर्जत पोलिस ठाण्यात झाल्यापासून कर्तव्यात कसूर करणे, अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांना दमदाटी करून अरेरावी व उर्मट भाषा वापरणे, बारमध्ये जाऊन मद्यपान करून धांगडधिंगा करणे, आरोपीसोबत धाब्यावर, वाढदिवस व ओल्या पार्ट्या करणे अशा अनेक तक्रारी येत असत आणि वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या.
पोलिस हवालदार हर्षद जमदाडे ह्याने कर्जत पोलिस ठाण्यात नवीन पोलिस निरीक्षक रुजू झाल्यानंतर रायटर म्हणून काम पाहत होते परंतु वरिष्ठांकडे प्रतिष्ठीत व्यक्तीची खोटी व दिशाभूल करणारी खोडसाळ माहिती देऊन वरिष्ठांच्या मनात द्वेष निर्माण करणे, पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन त्रास देणे, अवैध धंदेवाल्याकडून पैसे उकळणे अशी कृत्ये करीत हम करो सो कायदा प्रमाणे वागत असल्याने पोलिस हवालदार जमदाडे ह्याचेबद्दल जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून काही महिन्यांपूर्वी दहिवली परिसरातील एका बारमध्ये जाऊन मद्यपान करून बारचालकाला अरेरावी करत बिलावरून हुज्जत घातल्याप्रकरणी बारमालकाचा सपाटून मार खाल्ल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:24 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!