नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुपवाड एमआयडीसीत क्रेनला हायव्होल्टेज वाहिनीचा स्पर्श; विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू

बॉयलर पार्टची वाहतूक करताना दुर्घटना; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

🚨Dpt NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी- राजेंद्र पवार

मिरज, कुपवाड:- दि. २० ऑगस्ट २०२६ : कुपवाड एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौकात क्रेनमधून इंडस्ट्रियल बॉयलरचा लोखंडी पार्ट वाहून नेत असताना हायव्होल्टेज विद्युतवाहिनीचा क्रेनच्या हुकाला स्पर्श झाल्याने दोन कामगारांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला.प्रदीप दिलीप खराडे (वय ४१, रा. यशवंतनगर, कुपवाड) आणि रोहिदास भगवान उत्तरे (वय ३२, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) अशी मृत कामगारांची नावे आहेत.ही घटना मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास घडली. दोघेही क्रेनच्या सहाय्याने इंडस्ट्रियल बॉयलरचा लोखंडी पार्ट घेऊन जात होते. मेनन पिस्टन चौक परिसरातून जात असताना क्रेनच्या पुढील हुकाचा हायव्होल्टेज विद्युतवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे विद्युतप्रवाह क्रेनमध्ये उतरून प्रदीप खराडे आणि रोहिदास उत्तरे यांना जोरदार विजेचा धक्का बसला.विजेचा धक्का बसल्याने दोघेही बेशुद्ध होऊन खाली पडले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोघांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, दुर्घटनेमागील नेमकी कारणे, विद्युतवाहिनीची स्थिती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.कुपवाड एमआयडीसीतील या दुर्घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:34 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!