नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुपवाड-कवलापूर रोडवर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी : राजेंद्र पवार

मिरज :- कुपवाड-कवलापूर रस्त्यावर गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी ट्रॅक्टर आणि युनिकॉर्न दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सतीश रामचंद्र पाटील (रा. कवलापूर) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन यांचे पीए म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, युनिकॉर्न दुचाकी क्रमांक MH 10 DN 6867 आणि ट्रॅक्टर क्रमांक MH 10 3656, ट्रॉली क्रमांक MH 10 W 1974 ही वाहने कवलापूरच्या दिशेने जात होती. यावेळी युनिकॉर्न दुचाकी ट्रॅक्टरला पाठीमागून घासल्याने दुचाकीचा ताबा सुटला. बॅलन्स न राहिल्याने सतीश पाटील हे रस्त्यावर कोसळले आणि ट्रॅक्टरच्या टायरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुष हेल्पलाइन टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.यावेळी आयुष हेल्पलाइन टीमचे प्रमुख अविनाश पवार, तसेच चिंतामणी पवार, हिमांशू कुरळपकर, ओंकार गुटुकडे, शाहिद नदाफ, रोहन कांबळे, राजे हेगडे, यश मोहिते यांच्यासह स्थानिक नागरिक व पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

 

 

रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

 

कुपवाड ते कवलापूरकडे जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्ता अरुंद असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रस्त्यावरील खड्डे, अपुरी रुंदी आणि वाढलेली वाहतूक यामुळे भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण व सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.या अपघातामुळे कवलापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सतीश पाटील यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अपघाताबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:20 am, August 29, 2026
27°C
घनघोर बादल
67 %
22 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:13 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!