DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी :- नारायण कांबळे
कोल्हापूर:- जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीसारख्या तब्बल 31 पेक्षा अधिक गुन्ह्यांत वॉन्टेड असलेला सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ही मोठी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी रवींद्र धनाजी भोसलें (वय 24, रा. देवजीनगर, नारपोली, ता. भिवंडी, जि. ठाणे) हा आरोपी गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्याने जबरी चोरी करत मोबाईल लुटल्याची घटना उघडकीस आली होती.
या आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीचे एकूण 31 हून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. गुन्हा केल्यानंतर तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणे अवघड झाले होते. मात्र एलसीबीने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.
18 मार्चच्या रात्रीपासून ते 19 मार्चच्या पहाटेपर्यंत चाललेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान हा आरोपी कोल्हापूर शिवाजी पुलाजवळील पंचगंगा घाट परिसरात सापडला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धिरजकुमार, यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी व पोलीस उपनिरीक्षक आतिश म्हेत्रे, जालिंदर जाधव, संतोष गवळे व पोलीस अंमलदार यांनी केली असून, अधिक तपास सुरू आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



