नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ख्यातनाम चित्रकार श्रीधर अंभोरे आपल्या रेघोट्यांमध्ये विलीन 

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी मिलिंद इंगळे

 

अकोला :- जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे गेल्याचे बातमी ऐकली आणि मनाला चटका लावून गेली.

चित्रकार श्रीधर अंभोरे आपल्या आयुष्यात अनेक दलित साहित्य संमेलन जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलन त्यांच्या उपस्थितीमुळे अधुरेच असायचे त्यांनी अनेक दिग्गज कलाकार नामवंत साहित्यिक त्यांच्या आधी आदर सत्कार करायचे .

श्रीधर अंभोरे हे मुळचे चिखलगाव ता.बार्शिटाकळी जि. अकोल्याचे आहेत .

श्रीधर अंभोरे यांचा (जन्म 21 मार्च 1947) मध्ये झाला ते ७८ वर्षांचे होते.

हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार, कवी आणि हरहुन्नरी कलावंत होते.विशेष म्हणजे त्यांनी चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते, तरीही त्यांनी आपल्या आंतरिक प्रेरणेने ही कला पूर्णपणे आत्मसात केली होती. अहमदनगर येथे दीर्घकाळ टपाल खात्यात नोकरी करून ते निवृत्त झाले होते.कला आणि वैशिष्ट्येस्वतंत्र शैली: झाडे, प्राणी, पक्षी आणि विविध नैसर्गिक आकारांचा वापर करून त्यांनी आपली एक वेगळी चित्रशैली तयार केली आहे.सामाजिक जाणिवा: त्यांच्या चित्रांमध्ये शोषित, पीडित आणि सामान्य माणसांच्या वेदनांचे व संघर्षाचे दर्शन घडते.मुखपृष्ठ सजावट: महाराष्ट्रातील अनेक नियतकालिके, दिवाळी अंक आणि पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे त्यांनी केलेले रेखाटन विशेष प्रसिद्ध आहे.साहित्य संमेलने: विविध साहित्यिक व सांस्कृतिक संमेलनांच्या प्रतिकात्मक विचारपीठांची कल्पक सजावट त्यांनी केली आहे.पुरस्कार व सन्मानत्यांना प्रतिष्ठेच्या फाय फाउंडेशन पुरस्कारासह अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.त्यांच्या कलाकृतींची महती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर (उदा. न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव) मध्ये पोहोचली आहे.चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी ३०० वर साहित्यिकांच्या पुस्तकांना रेखाटने व मुखपृष्ठ अगदी विनामूल्य दिले ते छंद म्हणून,

श्रीधर अंभोरे यांनी 1980 मध्ये आदिम हे नियतमालिक सुरू केले होते. त्याचे ते संस्थापक कार्यकारी संपादक होते. त्यांच्या संपादकीय मंडळात सिने कलावंत सदाशिव अमरापूरकर यांचाही समावेश होता. आदिमचे 33 अंक निघाले. कादंबरीकर भालचंद्र नेमाडे हे आदिमचे पहिले वर्गणीदार आहेत. यात तीन दिवाळी अंकाचा समावेश आहे. 1982 मध्ये आदिम बंद पडले. आता वर्ष 2014 पासून प्रसिद्ध गझलकर श्रीकृष्ण राऊत हे अकोला येथून ई आदिम चालवित आहेत.

1983 मध्ये दूरदरर्शन दिंडी नावाची मराठी मालिका असे. यामध्ये विजय तेंडूलकर हे मराठीतील एका ख्यातकीर्त व्यक्तीमत्त्वाची ओळख करून देत असत. या मालिकेच्या दुस-या भागात विजय तेंडुलकर यांनी अंभोरे यांची चित्रकार म्हणून मुलाखत घेतली होती. त्यावेळी ती प्रसारितसुद्धा झाली. आज पुणे अभ्यास मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मराठी विषयातच्या पुस्तकात या मुलाखतीचा संपादित अंश विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे.

आज पर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार

फाय फाउंडेशन पुरस्कार (वर्ष 1983)

साहित्य-माणिक उत्कृष्ठ मुखपृष्ठकार पुरस्कार (वर्ष 2009)

पद्मश्री विखे पाटील फौंडेशन पुरस्कार 2009

अजिंठा पुरस्कार (वर्ष 2012)

पद्मश्री दया पवार पुरस्कार (वर्ष 2013)

अ.भा. मायबोली मराठी साहित्य संघाचा ‘विदर्भ भूषण ‘ पुरस्कार 2013

रुपाली दुदगावकर स्मृति पुरस्कार 2015 असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

श्रीधर अंभोरे आज ही त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून जिवंत राहतील .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:50 am, August 17, 2026
29°C
घनघोर बादल
61 %
22 Km/h
Wind Gust: 29 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!