नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ११.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी: परवेज शेख

धाराशिव: गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अत्यंत अमानुष आणि निर्दयी पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांवर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ६ गोवंशीय जनावरे आणि एक पिकअप वाहन असा एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहाटेच्या सुमारास पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, येरमाळा ते धाराशिव मार्गावरून एका वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
वाहनाची तपासणी आणि जनावरांची सुटका
माहिती मिळताच पोलिसांनी संशयास्पद वाहनाला थांबण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी पिकअप वाहनामध्ये अत्यंत दाटीवाटीने आणि जनावरांना हालचाल करण्यासही जागा नसलेल्या क्रूर अवस्थेत गोवंशीय जनावरे भरल्याचे आढळून आले. जनावरे कुठून आणली आणि कुठे नेली जात आहेत, याबाबत चालकाकडे विचारपूस केली असता त्याने कोणतीही वैध कागदपत्रे किंवा समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
गुन्हा दाखल, पोलीस हवालदार भांगे यांच्याकडे तपास
पोलिसांनी वाहन आणि जनावरे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली. दोन पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पंचनाम्यात ६ गोवंशीय जनावरे व पिकअप गाडी असा एकूण ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२३/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (क), (घ), (ड) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार १२५० भांगे करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही धडक कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, पोलीस नाईक अशोक ढगारे आणि पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!