नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चंदगडमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई दोघांवर गुन्हा.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी- संदीप सकट

कोल्हापूर:- चंदगड शहरातील मेनरोडवरील प्रणाम हॉटेलसमोरील खेळण्याच्या दुकानाच्या खालच्या तळमजल्यात जिन्याच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर चंदगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विजय गुंडू पाटील (वय ५७, रा. सातवणे, ता. चंदगड) हा सुनिल कोठारी (वय ४५, रा. चंदगड) याच्या सांगण्यावरून कल्याण मटका जुगाराचे आकडे घेऊन नागरिकांकडून पैसे स्वीकारत चिठ्ठ्या देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ११ हजार ९०० रुपये रोख, आकडे लिहिलेल्या ३२ चिठ्ठ्या, दोन बुक, मटका आकड्यांचे बाजीगर साप्ताहिकाचे पाच कागद व अन्य वर्तमानपत्रे, तसेच १० हजार रुपये किमतीचा पोको कंपनीचा मोबाईल, दोन बॉलपेन, स्टेपलर आणि चार कार्बन कागद असा मुद्देमाल जप्त केला.पोलिस अंमलदार ऋषीराज राजाराम कोरवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र.२८०/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये विजय गुंडू पाटील व सुनिल कोठारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी माने करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:33 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!