नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चाळीसगाव शहरात पोलिसांचा भव्य ‘रूट मार्च’; आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक बंदोबस्त

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम

🚨

प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला

चाळीसगाव: आगामी ईद-ए-मिलाद, पोळा, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव हे सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० दरम्यान चाळीसगाव शहरातील संवेदनशील भागांतून पोलिसांचा भव्य ‘रूट मार्च’ काढण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकरवाडी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च मुख्य मिरवणूक मार्गांवरून काढण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
रूट मार्चमधील पोलीस ताफा:
पोलीस अधिकारी: ०६ अधिकारी
पोलीस अंमलदार: ५० कर्मचारी (चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण व मेहुणबारे पोलीस स्टेशन)
होमगार्ड: ४० जवान
या रूट मार्चमध्ये चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि मेहुणबारे पोलीस स्टेशनचा फौजफाटा मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
आगामी सण-उत्सवांच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सामाजिक शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी सर्व सण शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
– सविनय सादर: पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:52 am, August 29, 2026
30°C
घनघोर बादल
55 %
29 Km/h
Wind Gust: 31 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:13 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!