नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

छत्रपतींच्या स्मारकाची विटंबना करणारा अखेर गजाआड

⭐नागरिकांत संभ्रम

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी

भिवापूर :– महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आझाद चौकातील स्मारकाची विटंबना करणाऱ्याला पोलिसांनी आज अटक केली. प्रफुल प्रभाकर विंचूरकर (वय 30, रा. आझाद चौक, भिवापूर) असे आरोपीचे नाव असून, मोबाईल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतल्यावर त्याने नामफलक फोडल्याची कबुली दिल्याची माहिती ठाणेदार निर्मल यांनी दिली.
शनिवारी (दि. 9) सकाळी स्मारकावरील दगडी नामफलक फोडल्याचे उघड होताच शहरात संतापाची लाट उसळली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपीने ही तोडफोड केली होती. ही घटना समजताच शिवसेना शहरप्रमुख महेश डडमल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनवर धडक देत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. शिवसेनेतर्फे सोमवारी मोर्चा काढण्याची तयारीदेखील सुरू होती.
या घटनेमागे ‘कुण्या शहाण्याचे डोके’ असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत होता. अशातच मोबाईल चोरीच्या तपासातून पोलिसांच्या हाती हा गुन्हेगार लागल्याचे सांगण्यात येते. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 324(3) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 3 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

—> नागरिकांचा विश्वास बसेना

आरोपी प्रफुल याला आई – वडील नाही. तो एकटाच रहात असून मिळेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह करतो. त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येते. वरील स्मारक विटंबना प्रकरणात त्याला पोलिसांकडून आरोपी ठरविण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!