नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जंगमहट्टी हर्षद खून प्रकरणी आरोपीना पोलीस कोठडी.

तपास जलद व न्याय करण्याचे चंदगड पोलिसांचे आवाहन

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी. संदीप सकट

कोल्हापूर :- चंदगड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 294/2026 बी एन एस कलम 137(2), 140(1) 3(5)हर्षद खून प्रकरण या गुन्ह्यामधील तीन अटक आरोपीना काल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 10/ 9/2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाली आहे.
आरोपीच्या निवेदन पंचनाम्या प्रमाणे स्वप्नवेल येथील सुमारे 350 फूट खोल दरीतून अत्यंत अवघड डोंगर कडा उतरून rescque team च्या मदतीने अपहरण झालेल्या हर्षद हुंदळेकर याचे प्रेत काढण्यात पोलिसांना यश आले. इन्क्वेस्ट पंचनामा व पोस्टमार्टम नंतर प्रेत ताब्यात घेण्यास नकार देऊन नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु सदर गुन्ह्यात निष्पन्न होणाऱ्या सर्व आरोपीवर कारवाई करून त्यांना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी पोलीस सर्वतोपारी प्रयत्न करतील याची हमी दिल्यानंतर नातेवाईकानी प्रेत ताब्यात घेऊन अंत्यविधी केला आहे. सदर गुन्ह्यात BNS क 103(1) व 238 ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
उषा नाईक हिने इंस्टाग्राम अकाउंट काढून, इंस्टाग्राम वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, पार्ले गावाजवळ बोलावून घेऊन अपहरण झालेल्या पीडित मुलास अपहरण व खुनासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे उषा परशराम नाईक वय 23 वर्ष रा. जंगमहट्टी फाटा, ता. चंदगड मूळ रा हलकर्णी ता. चंदगड हीस काल दि. 3 /9/26 रोजी अटक करण्यात आली होती. तिला आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने 10/ 9/2026 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.
फॉरेन्सिक टीम गडहिंग्लज विभाग यांची मदत घेऊन अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पुन्हा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कोल्हापूर,अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज, विभाग कॅम्प इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार चंदगड पोलीस ठाणे हे कसून तपास करीत आहेत.तपासात या प्रकरणात अधिक कोण कोण सामील आहे, व याचे धागेदोरे कुणापर्यंत पोचतील याचा शोध चंदगड पोलिसाकडून घेतला जात आहे. सदर हर्षदच्या खूनाने चंदगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!