नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जुन्या भांडणातून ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

वेल्हे : जुन्या भांडणाच्या कारणावरून ७५ वर्षीय वृद्धाला पाठलाग करून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राजगड तालुक्यातील वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत विजय मारुती बसवे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय बसवे हे राजगड तालुक्यातील माळवली गावचे रहिवासी आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून आरोपी ओंकार बाळू जाधव याने त्यांचा पाठलाग करून गोळीबार केला. या हल्ल्यात विजय बसवे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपी ओंकार बाळू जाधव याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:31 am, October 17, 2026
26°C
घनघोर बादल
53 %
6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:26 am
Sunset: 6:05 pm
Translate »
error: Content is protected !!