नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर कोयता-विळ्याने हल्ला चंदगड पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.



🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी- संदीप सकट चंदगड

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर कोयता व विळ्याने हल्ला केल्याची घटना पाटणे फाटा येथे घडली. या हल्ल्यात अजय दत्तू नाईक (वय २८, रा. वरगाव, ता. चंदगड; सध्या रा. चंदगड बसस्थानकामागे) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर दत्तू नाईक आणि अशोक रामू नाईक (दोघेही रा. वरगाव, ता. चंदगड) यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटणे फाटा येथील शारदा मोबाईल शॉपीसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. फिर्यादी अजय नाईक हा त्याचा मित्र संदीप चव्हाण याला भेटण्यासाठी शारदा मोबाईल शॉपी येथे गेला होता.यावेळी ज्ञानेश्वर नाईक आणि अशोक नाईक हे दोघे हातात कोयता व विळा घेऊन तेथे आले. अजय नाईक आणि त्याची पत्नी निशा यांनी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर त्याला शॉपीसमोरील मोकळ्या जागेत ओढून नेण्यात आले.
तेथे ज्ञानेश्वर नाईक याने कोयत्याने अजयच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटाजवळ वार केले. तसेच अशोक नाईक याने विळ्याने डोक्यावर व मानेवर वार करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात अजयच्या डोक्याला, मानेला, हाताच्या मनगटाजवळ तसेच पोटाला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३(५) आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:30 am, October 17, 2026
26°C
घनघोर बादल
53 %
6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:26 am
Sunset: 6:05 pm
Translate »
error: Content is protected !!