नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या


औरंगाबाद : -भुवनेश दुसाने.औरंगाबादमध्ये एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. २४ वर्षीय विवाहितेने आपल्या ३ वर्षाच्या लेकीसह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पूनम गणेश विसपुते (वय २४) तर शांभवी विसपुते (वय ०३) असे माय-लेकीचं नाव आहे.
तर उडी मारण्यापूर्वी महिलेने भावाला, पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,’ असे म्हटले आहे. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
नाथनगरात माहेर असलेल्या पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. गणेश गुजरातमधील नवसारी येथील एका कंपनीत कामाला आहे. सासरच्या छळाला कंटाळून ती सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती.
शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळी औरंगाबादला आली. मात्र, तत्पूर्वीच पूनम शंभवीला घेऊन घराबाहेर पडली होती. तिची शोधाशोध सुरू असतानाच लासूर स्टेशन-पोटूळ रेल्वे स्टेशनदरम्यान एक महिला, मुलीचा मृत्यू झाला पोलीस तपास चालू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:01 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!