नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार आरटीओ ॲक्शन मोडवर; खासगी ट्रॅव्हल्स चालकांची नियमित ड्रिंक टेस्ट सुरू.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण


नंदुरबार: मद्यप्राशन करून वाहन चालवत स्वतःसह प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांविरोधात नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कडक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात मद्यधुंद चालकामुळे झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून खासगी ट्रॅव्हल्स चालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पुणे, मुंबईसह विविध शहरांकडे धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची आता नियमित ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ चाचणी केली जाणार आहे. महामार्गांवर विशेष नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरच्या सहाय्याने चालकांची तपासणी केली जात असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
आरटीओ प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, तपासणीत मद्यप्राशन केल्याचे आढळून येणाऱ्या चालकांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधित चालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

खासगी ट्रॅव्हल्स चालकांची नियमित वैद्यकीय व मद्यपान तपासणी होत नसल्याने अनेकदा प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची तक्रार समोर येत होती.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमधून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आरटीओची ही धडक मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. “मद्यधुंद चालकांना आता रस्त्यावर थारा नाही,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!