नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचा समाजाभिमुख पुढाकार : एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : साईनाथ खंडेराय

नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतजमिनी, घरं व संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी समाजाभिमुख भूमिका घेत आपला एक महिन्याचा पगार (अंदाजे १ लाख रुपये) पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबतचे पत्र पोलीस अधीक्षक नांदेड यांना सादर केले असून हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन फंड, संबंधित स्वयंसेवी संस्था (NGO) किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुरग्रस्त गावचे रहिवासी असल्याने या आपत्तीचे दुःख किती खोलवर आहे, याची जाणीव चिंचोलकर यांना आहे. सामाजिक बांधिलकीची जपणूक करत त्यांनी घेतलेला हा निर्णय केवळ प्रशासनिक जबाबदारीपुरता मर्यादित नसून समाजाशी असलेल्या नाळीचे प्रतीक आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी उचललेले हे आदर्शवत पाऊल जिल्ह्यातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे जनतेला दिलासा मिळून संकट काळात आधार वाटणारा हात मिळाला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!