नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बलात्काराच्या गुन्ह्यातील कॅप्टन अशोक खरात ज्योतिषाला पहाटे नाशिक गुन्हे शाखेने केली अटक

DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी शांतारामभाऊ दुनबळे

नाशिक-: अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन वय ६७, रा. फ्लॅट नं.३७, तृप्त बाला कर्मयोगीनगर, तिडके कॉलनी, नाशिक असे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नोव्हेंबर २०२२ -२६ मध्ये पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला या भोंदू बाबाला कॅनडा कॉर्नरवरील ओकस प्रॉपर्टीज येथे भेटली होती. त्या ठिकाणी हा अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक राजकीय नेत्यांचा ज्योतिषी असलेल्या तसेच बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोप असलेल्या ज्योतिषाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आज पहाटे अटक केली आहे.

पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्याने पीडितीला ओकस प्रॉपर्टीज येथे बोलावून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन तिला गुंगीकारक पदार्थ खायला आणि प्यायला दिले. नंतर तिला संमोहित करून तुझे आयुष्य बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली आणि पतीला मरणाची भीती घालून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या तीन वर्षांच्या
कालावधीत खरातने पीडितीवर वेळोवेळी अत्याचार केले.
तीन वर्षांनतर पीडितीने त्याची
भांडाफोड करून त्याच्याविरूद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या नराधमाला आज पहाटे अटक केली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयाची तपासणी केली असता नामांकित महिला आणि सेलिब्रिटी यांच्याशी संबंधित ५८ व्हिडिओ जप्त केले असून, त्याची तपासणी सुरू असल्याचे समजते. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चेंट नेव्हीमधून निवृत्त झाला आहे. नंतर त्याने प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख मिळविली. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला.अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचे खरे रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.
हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे…
अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत.
विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता.
विशेष म्हणजे खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते.
आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ?
योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजमान आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!