नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मणेऱ मळा खूनप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर : मणेऱ मळा परिसरात घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत अटक करत धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद तपासाचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणेऱ मळा येथील रहिवासी प्रशांत बाबुराव पंडित यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उजाळाईवाडी परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी यश दीपक दोरकर (वय २१) व अमित खुंदबुद्दीन आयनापुरे (वय २२) या दोघांना अटक केली असून ते विक्रमनगर, कोल्हापूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. जुन्या वादातून प्रशांत पंडित यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास गांधीनगर पोलिस ठाण्याकडून सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!