नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राक्षेवाडीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस!

सात तोळे सोने व चांदीचे दागिने असा सुमारे ४.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश


प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले


खेड, पुणे :- खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा खेड पोलिसांनी यशस्वी तपास करून उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ९६ हजार ६५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी राक्षेवाडी येथील साईयोग अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी निलेश बापू जांभळे (वय ३१ वर्षे) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून आरोपी नामे साहिल भांबुरे व विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार संबंधित बालकाला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे विविध दागिने हस्तगत करण्यात आले. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, चैन, ब्रेसलेट तसेच चांदीचे पैंजण व इतर दागिन्यांचा समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख ९६ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल तांबोळी, पोलीस हवालदार संतोष घोलप, पोलीस अंमलदार महेश गोसावी, सुरज राक्षे व संकेत कवडे यांनी केली.
खेड पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून, नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:32 am, October 17, 2026
26°C
घनघोर बादल
53 %
6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:26 am
Sunset: 6:05 pm
Translate »
error: Content is protected !!