🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी रमजान मुलानी
जिल्ह्यात ग्रामरक्षक दल स्थापन करा!शिवसृष्टी ग्लोबल फाउंडेशन सचिन देसाई यांची सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन.
प्रतिनिधी- रमजान मुल्लांनी सांगली
जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालून तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदींनुसार ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात यावे, अशी मागणी शिवसृष्टी ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन देसाई यांचे वतीने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित प्रशासकीय विभागांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.सांगली जिल्ह्यातील विविध भागांत अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या प्रकारांना प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अवैध दारूविक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर होत आहे. विशेषत व्यसनामुळे महिलांना छळवणुकीला सामोरे जावे लागण्याच्या घटना घडत असल्याने सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व शासन परिपत्रकांचा आधार
घेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम १३४-अ तसेच ग्रामरक्षक दल नियम, २०१७ आणि संबंधित शासन परिपत्रकांच्या अनुषंगाने ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात जनजागृती आणि कायदेशीर चौकटीत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका फाउंडेशनने मांडली आहे.जिल्ह्यात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत. तसेच जिल्ह्यातील संबंधित कार्यालये व आस्थापनांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.फाउंडेशनच्या सदस्यांना ग्रामरक्षक दलात सहभागी करून घेण्याची मागणी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याच्या प्रक्रियेत शिवसृष्टी ग्लोबल फाउंडेशनच्या विविध स्तरांवरील सदस्यांना नियमानुसार सहभागी करून घेण्यात यावे, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. अवैध दारूविक्रीला आळा घालणे,
व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रशासनाला सहकार्य करणे, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे निवेदनातून स्पष्ट होते.आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



