नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लोणावळ्यात पर्यटकाकडून खंडणी वसूल करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; तिघेही अटकेत

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले 

​लोणावळा: लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांकडून बेकायदेशीरपणे खंडणी वसूल करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) तीन कर्मचाऱ्यांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास खंडाळा एक्झिटजवळ घडली.

​घटनाक्रम:

कल्याण येथे राहणारे व मूळचे भोपाळ (मध्य प्रदेश) येथील व्यावसायिक शिक्षक विक्रमसिंह मोतीसिंह रघुवंशी (वय ३३) हे आपल्या पत्नीसह रॉयल एनफिल्ड बुलेटने (क्र. २५बीएच ०३७३ एल) खंडाळा एक्झिटवरून जात होते. यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीस खंडाळा दलाकडे कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी — १) निलेश अशोक साळुंखे, २) रोहीदास बादाम पाटील आणि ३) राजेश सूर्यकांत केंद्र — त्यांना अडवले.

​”तुम्ही फोर व्हिलरच्या मार्गाने टू व्हिलर चालवत आहात, येथे टू व्हिलरला बंदी आहे,” असे सांगून त्यांनी ६,००० रुपये दंड, लायसन्स सस्पेंड आणि गाडी जप्त करण्याची धमकी दिली. त्यानंतर तडजोड करून कारवाई न करण्यासाठी अमोल गणपत डोके यांच्या ऑनलाइन क्यूआर कोडवर १,००० रुपये खंडणी म्हणून स्वीकारले.

​संशय आल्याने तक्रारदाराने स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता, सदर व्यक्ती पोलीस नसून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराने तत्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. लोणावळा शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

​पोलीस कारवाई:

तक्रारदाराच्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ३०८(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (लोणावळा) श्री. गजानन टोम्पे आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण लोकरे पुढील तपास करत आहेत.

​पोलीस प्रशासनाचे आवाहन:

लोणावळा व खंडाळा परिसरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला रस्त्यावर रोख रक्कम किंवा ऑनलाइन दंड देऊ नये. असा कोणताही प्रकार घडल्यास तत्काळ ११२ क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:26 am, October 2, 2026
26°C
साफ आकाश
50 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:21 am
Sunset: 6:18 pm
Translate »
error: Content is protected !!