नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिवाऱ्या डोंगरावर प्रेमी युगुल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले; पिंपळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी अकिल शहा

साक्री : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेले शेंदवड-मोहगाव शिवारातील शिवाऱ्या डोंगरावर झाडाला गळफास घेत प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या दुर्देवी घटनेने परीसरात शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रात्री घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता डोंगरावर दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने पिंपळनेरसह पश्चिम पट्टयात खळबळ उडाली आहे.पल्लवी अभिमान बहिरम(वय १८) रा. वडपाडा-शेंदवड आणि अरुण जेजिराम चौरे(वय २३) रा. मोहगाव-शेंदवड अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वेगवेगळ्या पाड्यांवर राहत होते.
पल्लवी ही वडपाडा येथे आई-वडिलांसोबत राहत होती. मंगळवारी रात्री ती घरातून बाहेर गेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले त्याच सुमारास अरुण हा देखील जेवण करून कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. दोघेही रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

शोध सुरू असताना एका ग्रामस्थाला अरुण हा डोंगराच्या दिशेने जाताना दिसल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यावरून कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला. अखेर गावालगतच्या शिवारातील शिवाऱ्या डोंगरावर दोघेही आढळून आले. त्यांची स्थिती पाहून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकूल वातावरणात दोघांवर उशिराने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मृत तरुणीचे वडील अभिमन काशीराम बहिरम यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नं.५३/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३(BNNS) मधील कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आय. जी. शिरसाठ करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:50 am, August 17, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
8 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!