नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सुकटा मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी लोणावळ्यातून जेरबंद


पवनचक्कीच्या वादातून लोखंडी रॉडने केली होती गंभीर मारहाण; भूम पोलिसांची कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी परवेज शेख


धाराशिव, भूम : सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीला अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या बबन जानकर (वय ३१, रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) याला भूम पोलिसांनी लोणावळा येथून शिताफीने अटक केली. आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो लोणावळ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीला अडवून लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी तपास पूर्ण करून निष्पन्न आरोपींविरुद्ध यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकर हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

फरार आरोपी वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी लोणावळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस पथकाला आवश्यक सूचना देऊन आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे नियोजन केले.

त्यानुसार भूम पोलिसांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने लोणावळा परिसरात सापळा रचला. रात्रीच्या सुमारास आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या सचिन उर्फ भैय्या जानकर याच्याविरुद्ध धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये वाकड पोलीस ठाण्यात २०१५ आणि २०१८ मधील गुन्हे, दिघी पोलीस ठाण्यात २०२० मधील गुन्हा, भूम पोलीस ठाण्यात २०२३ मधील गुन्हा तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व मुंबई पोलीस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

ही कारवाई धाराशिवचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कवडे आणि जयराम क्षीरसागर यांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने ही कामगिरी पार पाडली.

अटक आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 am, October 22, 2026
30°C
घनघोर बादल
46 %
14 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:28 am
Sunset: 6:01 pm
Translate »
error: Content is protected !!