नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हिमायतनगर शहर व तालुक्यात भरदिवसा दारू व गुटखा अवैध विक्री सर्रास सुरू, संबंधित अधिकार्‍यांची ‘अर्थ’पुर्ण डोळेझाक…….

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

हिमायतनगर:- हिमायतनगर शहरासह तालुक्यात अवैध दारू व गुटखा जणू महापूर आल्याचे संतप्त चित्र याची देही, याची डोळा पहावयास दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्क व अन्नसुरक्षा विभाग कार्यालयासह पोलिसांनी या अवैध बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, परंतू कोणालाही या प्रश्नाचे काहीच देणे-घेणे वाटत नाही का? असा संतप्त सवाल जागरुक नागरिक उपस्थित करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हिमायतनगर तालुका हद्दीतील डोल्हारी, पळसपूर, घारापूर, खडकी, सरसम ,पवना, आंदेगाव टेभी, सोनारी फाटा ,दुधड, वाळकेवाडी, सवना, चिचोडी, एकघरी, बुरकुलवाडी, दरेसरसम ,कारला, वडगाव शिबधरा, मंगरुळ, खैरगाव वारंगटाकळी, धानोरा, एकंबा, सिरजनी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या देशी- दारु व गुटखा सर्रास विक्री केली जात आहे. हिमायतनगर शहर येथून अवैधरीत्या – देशी-विदेशी दारू व गुटखा किरकोळ विक्रेते परवानाधारकांकडून ठोक स्वरूपात चार चाकी व नंतर मोटारसायकलवरून शहर व ग्रामीण भागात पाहिजे तेथे पाहिजे त्याला अवैध दारु व गुटखा दररोज पुरविला जात आहे. हा गैरप्रकार किनवट दारु उत्पादन शुल्कचे अधिकारी व अन्न सुरक्षा विभाग व अन्य जिल्हा प्रशासन यांच्या लक्षात ही बाब येत नाही, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

हिमायतनगर तालुक्यात एखादी अपघाताची घटना घडल्यास तेवढ्या तत्परतेने रुग्णवाहिका पोहोचत नसेल, तेव्हड्या तत्परतेने अवैध दारू व गुटखा पोहोचविले जात आहे. यामुळे 24 तास विना परवाना काही हॉटेल्ससह ढाबे, खानावळ, पाणटपर्‍या, किराणा दुकाने अशा ठिकाणी अवैध दारु व गुटखा खुलेआम विक्री होत आहे. यामुळे हिमायतनगर तालुक्यात- सुव्यस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेश विसर्जन , दुर्गा विसर्जन असलेल्या दिवशी हिमायतनगर शहरातील अनेक भागासह तालुक्यातील बहुतांश गावागावात खुलेआम अवैधपणे दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही परवाना धारक दुकानदार व बियरबारवाल्यांकडून मागच्या दरवाजाने सर्रास मद्याची विक्री होते. अवैध दारु विक्री वाढल्याने व्यसनाधिनता वाढत आहे. अवैध दारु विक्रेत्यांना किनवटचे दारु उत्पादन शुल्क अधिकारी व अन्न सुरक्षा विभाग ,तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्या ‘अर्थ’पूर्ण संबंधातून या सर्व गोष्टींना छूपा पाठिंबा मिळत आहे की काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
याला जबाबदार कोण..?
गेल्या काही दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यात अवैध दारू विक्री व गुटखा विक्री दिवसा ढवळ्या हा धंदा दररोज सुरू आहे, परंतू कोणाचेही या गैरप्रकाराकडे लक्ष गेल्याचे वास्तव चित्र दिसत नाही. पहाटे 5 वाजेपासून अगदी सहज अवैध दारू व गुटखा विकत मिळत असल्याने युवा, तरुण दारूच्या आहारी जात आहेत. व्यसनामुळे काही तरुणांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अवैध मार्गाने होणार्‍या अवैध दारुची विक्री व गुटखा तत्काळ बंद करावे, अशी संतप्त मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!