नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हेरवाडमध्ये दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक ; तीघे जखमी

प्रतिनिधी सचिन कोळी


हेरवाड – तेरवाड मार्गावर असलेल्या आर.बी. पेट्रोलियम समोर दोन मोटारसायकली मध्ये झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हेरवाड येथील आर.बी. पेट्रोलियम समोर तेरवाडकडे जाणार्‍या एक्टिवा व गाडीत पेट्रोल भरून बाहेर पडणारी मोटरसायकल यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांना गंभीर दुखापत झाली असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. यामधील एक मोटरसायकलधारक कुरुंदवाड येथील असल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राम ओंबासे दाखल झाले व तातडीने जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. या घटनेची माहिती मिळताच गांवचे सरपंच सुरगोंडा पाटील व अर्जुन जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या अपघातातील जखमींवर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:53 am, October 22, 2026
32°C
घनघोर बादल
40 %
14 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 92%
Visibility: 10 km
Sunrise: 6:28 am
Sunset: 6:01 pm
Translate »
error: Content is protected !!