नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

20 दिवसांच्या अथक तपासानंतर चाकण उत्तर पोलिसांचा मोठा यशस्वी ब्रेकथ्रू; अज्ञात इसमाच्या निर्घृण खुनाचा पर्दाफाश

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

चाकण:- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मौजे बिरदवडी गावाच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी आढळलेल्या अज्ञात इसमाच्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. मृताची ओळख पटू नये म्हणून धारदार हत्याराने डोक्यावर वार करून चेहरा दगडाने विद्रूप करण्यात आला होता.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गु.र. नं. 47/2026 अन्वये बी.एन.एस. कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोणताही ठोस पुरावा नसतानाही चाकण उत्तर पोलिसांच्या तपास पथकाने सलग 20 दिवस अहोरात्र मेहनत घेत सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील नागरिक, कामगार अड्डे, मिसिंग रेकॉर्ड, भिंतीपत्रके व सोशल मीडियाच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान मिळालेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोपेडचा शोध घेण्यात आला. त्यावरून आरोपी निखील नानासाहेब चव्हाण (वय 21), स्वप्नील नरहरी पारधी (वय 19) व उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) यांना अटक करण्यात आली. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून मृत मुंजा धोंडीबा नरहिरे (वय 25, रा. गंगाखेड, जि. परभणी) याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
दारू पिण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मृताची ओळख नष्ट करण्यासाठी चेहरा पूर्णपणे छिन्न-विछिन्न करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत क्लिष्ट गुन्हा उघड करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!