DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नंदकुमार नामदास
कळवा (ठाणे) – कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 1/212/2021 भा.दं.वि. कलम 376 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 अंतर्गत दि. 4 जुलै 2021 रोजी सायं. 3.11 वाजता दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील पाहिजे आरोपी सोहेल उर्फ कुवेत मोहम्मद शेख (वय 40 वर्षे), रा. एकता चाळ, मफतलाल कंपनी, शातीनगर, कळवा पूर्व, ठाणे. मूळ रा. कालुबस्ती, आउटपोस्ट पाचडिमटी, थाना- इस्लामपुर, जिल्हा उत्तर दिनाजपूर, राज्य पश्चिम बंगाल, हा अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने मा. जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष कोर्ट, ठाणे यांनी त्यास ‘उद्घोषित अपराधी’ म्हणून घोषित केले आहे.
पोलिसांनी जनतेस आवाहन केले आहे की, सदर आरोपी दिसून येताच किंवा मिळून येताच तात्काळ कळवा पोलीस स्टेशन, ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 022-25347233 वर संपर्क साधावा.



