नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दारूसाठी २०० रुपये न दिल्याने खून

⭐रेल्वे स्थानकातील खूनप्रकरणी एकास अटक; तीन दिवस पोलिस कोठडी
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

मिरज:- मिरज रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. मृताचे नाव सतीश बाबुराव मोहिते (वय 40, रा. इचलकरंजी रस्ता, हातकणंगले) असे आहे. अवघ्या २०० रुपयांसाठी ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संतोष उर्फ संजय दुर्गा निंबाळकर (वय 38, रा. तिवटणा, जि. परभणी) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेच्या दिवशी सतीश आणि संतोष दारू पिण्यासाठी दुकानात गेले होते. नंतर सतीश मिरज रेल्वे स्थानकात आला, तर संतोषही त्याच्या मागे आला. संतोषने सतीशकडे दारूसाठी पैशांची मागणी केली, मात्र सतीशने ती नाकारली. यामुळे संतोष संतापला व त्याने काठीने सतीशच्या डोक्यात बेदम मारहाण केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सतीशने वर्षभरापूर्वी आपले घर सोडले होते. त्यानंतर तो घरी परतलाच नव्हता. तो मिळेल ते छोटे-मोठे काम करीत असे तसेच रस्त्यावर पडलेल्या बाटल्या आणि भंगार गोळा करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो मिरज ग्रामीण व मिरज शहर बसस्थानक परिसरात वास्तव्यास होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!