⭐सार्वजनिक बांधकाम विभागाला छावणीचे स्वरुप
⭐कार्यकारी अभियंता सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यात, आज कंत्राटदार ने केला आत्मदहनचा प्रयत्न.
⭐पोलिसांनी कंत्राटदाराला घेतले ताब्यात.
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- प्रतिक पांडे
वर्धा:- सार्वजनिक बांधकाम विभागाने विकासाच्या नावावर कोट्यावधीचे कामे कंत्राटदाराकडून करून घेतले. कंत्राटदाराने कर्ज घेऊन ते काम पूर्ण केले. मात्र सरकार त्या कामाचे देयके देत नसल्यामुळे कर्जदारांनी या कंत्राटदारांकडे तगादा लावला असून, त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यामुळे येथील कार्यकारी अभियंता सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यात असून, कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला छावणीचे स्वरुप आल्याचे दिसून येते.
कंत्राटदार बाबा जाकीर यांनी मी केलेल्या कामाचे देयके न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी
आत्मदहन करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. तसेच अन्य एका कंत्राटदाराने सुद्धा आत्मदहन करणार असल्याची सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा व आर्वी तसेच जिल्हा परिषद जलजीवन मिशन व सिंचन विभागाकडे असे एकूण ६५० कोटी रुपये कंत्राटदारांचे थकीत आहे. सरकारने विकासाचा कांगावा करत उधारीवर काम करून घेतले कंत्राटदाराकडून व आता देयके द्यायला निधी नसल्याचे अधिकारी सांगत आहे. कंत्राटदारांनी कर्ज काढून विकासाचे काम पूर्ण केले.
त्यामुळे आता ज्यांच्याकडून कर्ज घेतले ते कंत्राटदाराकडे चक्कर मारून कर्जाची परतफेड करण्यास सांगत आहे. तसेच कर्ज न फेडल्यामुळे कंत्राटदारांना वारंवार अपमानीत व्हावे लागत आहे. हा मानसिक त्रास कंत्राटदारांना होत असून, सरकार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचे बाबा जाकीर व अन्य एका कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. एकीकडे कर्जबाजारी बांधकाम कंत्राटदार त्रस्त असून, दुसरीकडे कार्यकारी अभियंता सुरक्षारक्षक घेऊन फिरत असल्याची चर्चा होत आहे.



