नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

✨ कर्तव्याशी निष्ठा जपणाऱ्या ‘जिद्दी’ पो. उपनिरीक्षक सुर्यभान कागणे यांना सलाम! ✨

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड : पोलीस दलातील अनेक अधिकारी त्यांच्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे ओळखले जातात. पण काही व्यक्तिमत्वे अशी असतात, जी प्रतिकूल परिस्थितीतूनही धैर्याने उभी राहतात आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात. पोलीस उपनिरीक्षक सुर्यभान दिगांबरराव कागणे हे असेच एक नाव!
34 वर्षांची अखंड सेवा बजावून ते 30 सप्टेंबर 2025 रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, त्यांच्या सेवाकाळाची कहाणी ही केवळ नोकरीची नाही, तर जिद्द, संघर्ष आणि अपंगत्वावर मात करण्याची गाथा आहे.
हिब्बट (ता. मुखेड) येथील साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुर्यभान कागणे यांनी 4 सप्टेंबर 1991 रोजी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नांदेड पोलीस दलात प्रवेश केला. त्यांच्या सेवेत बिलोली, वजीराबाद, विशेष सुरक्षा विभाग, महामार्ग पथक, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष तसेच जनसंपर्क विभाग अशा अनेक शाखांचा समावेश आहे.
मात्र, 30 जुलै 2005 रोजीच्या अपघाताने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. महामार्ग पथकातील गस्तीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आणि ते कायमचे अपंग झाले. अशा परिस्थितीत कोणी हार मानली असती, पण कागणे यांनी अपंगत्वाला शरण न जाता केवळ 10 महिन्यांच्या उपचारानंतर 20 मे 2006 रोजी पुन्हा पोलीस गणवेश परिधान करून कर्तव्यावर रुजू झाले.
त्यानंतरचे दोन दशके त्यांनी व्हिलचेअरवरूनच जबाबदाऱ्या पार पाडत अपंगत्वाला कधीच आपल्या कामात अडथळा होऊ दिला नाही. जनसंपर्क विभागात त्यांनी हजारो नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, नागरिक व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील दुवा बनून राहिले, प्रसारमाध्यमांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून पोलीस दलाचा सकारात्मक चेहरा उभा केला.
त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली. तसेच कार्यकाळात विविध पोलीस अधीक्षकांनी 85 हून अधिक बक्षिसांनी गौरवले. शासनामार्फत 2011 मध्ये त्यांना विशेष सुविधा असलेली स्कूटर व व्हिलचेअर मिळाल्याने ते दररोज नियमितपणे कर्तव्यावर पोहोचत राहिले.
आज त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आठवणीत कागणे यांची प्रतिमा ही केवळ एका अधिकाऱ्याची नाही, तर निस्वार्थ सेवाभाव, अपार धैर्य आणि चिकाटीचे प्रतीक म्हणून कायम राहणार आहे.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कागणे यांच्याविषयी पोलीस दलात, तसेच समाजात एकच भावना व्यक्त होते —
👉 “अपंगत्वाला हरवूनही कर्तव्याशी निष्ठा राखणाऱ्या या जिद्दी अधिकाऱ्याला शतशः सलाम!”

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!