नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या “आशीर्वादाने” गावोगावी दारू विक्रीचा धुमाकूळ!

बीट जमादार कोमात, दारू सप्लायर जोमात!

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – साईनाथ खंडेराय

नांदेड:- जिल्ह्यातील सगरोळी, सावळी, कुंडलवाडी परिसरात खुलेआम भेसळयुक्त दारू आणि शिंदी विक्री सुरु असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या “मूक आशीर्वादाने” हा अवैध धंदा फोफावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांमध्ये बेकायदेशीर दारू व शिंदी विक्री केंद्रे बिनधास्तपणे सुरू आहेत. या दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून घरगुती वाद, महिलांवरील अत्याचार आणि मारहाणीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक महिलांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने गावोगावी अवैध दारू विक्रीचा बाजार तेजीत आहे. काही गावांत पोलिसांना माहिती देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून मागणी होत आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.
📍 संपादकीय निरीक्षण:
दारूच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीमुळे सामाजिक वातावरण अस्थिर होत असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा “दारू-मुक्ती”च्या ऐवजी “दारू-वाढ” योजना सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:57 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!