नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गांजा विक्री करणा-या दोन अल्पवयीनांना घेतले ताब्यात – गांधी चौक पोलीसांची कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

मिरज:- “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत सातत्याने अमली पदार्थांविरोधात कारवाई करत मिरज पोलिसांनी आणखी एक यशस्वी धाड टाकले आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज येथील आंबेडकर उद्यान परिसरात गांजा विक्री करणा-या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २ किलो तयार गांजा आणि सुजुकी अॅक्सेस मोपेडसह एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.४३ वा. करण्यात आली असून गुन्हा गु.र.नं. २६८/२०२५ नोंदविण्यात आला आहे. संबंधितांवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)ii(ब), २२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत सहा. पो.नि. संदीप गुरव, संभाजी गायकवाड, तसेच पोलीस कर्मचारी नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, सुनिल माने, विजय शेरेकर, अजितसिंग कोळेकर, मोहसिन टिनमेकर व चालक सुनिल कांबळे यांनी सहभाग घेतला.
महात्मा गांधी चौक पोलिसांनी शहरात नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर आळा बसवण्यासाठी घेतलेली ही प्रभावी कारवाई नागरिकांतून कौतुकास पात्र ठरली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!