नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हरविलेले ०८ मोबाईल तक्रारदारांना परत — एमआयडीसी कुपवाड पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी राजेंद्र पवार

सांगली:- एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने हरविलेले ०८ मोबाईल फोन शोधून त्यांचे मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत एकूण ₹१,३५,०००/- किंमतीचे मोबाईल फोन परत मिळविण्यात आले.
या विशेष कारवाईचे मार्गदर्शन मा. श्री सुनिल फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र), मा. श्री संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली), मा. श्रीमती कल्पना बारवकर (अपर पोलीस अधीक्षक, सांगली) आणि मा. श्री प्रणिल गिल्डा (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या मोहिमेचे नेतृत्व सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे (प्रभारी, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासो नरुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी ही कारवाई केली.
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, तसेच मा. कल्पना बारवकर आणि मा. प्रणिल गिल्डा यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरविलेले मोबाईल शोधून मालकांना परत देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पो. कॉ. अमोल जाधव यांनी CEIR पोर्टलद्वारे मोबाईल ट्रेस करण्याचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाईलची ठिकाणे शोधली. तपासातून एकूण ०८ मोबाईल मिळून आले.
यानंतर हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. एकूण ₹१,३५,०००/- किंमतीचे मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी एमआयडीसी कुपवाड पोलिसांसह सांगली पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
या कारवाईमुळे पोलिस प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, तांत्रिक साधनांच्या मदतीने पोलिसांनी लोकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दिशेने घेतलेले हे पाऊल प्रशंसनीय ठरले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:00 am, April 18, 2026
33°C
घनघोर बादल
14 %
14 Km/h
Wind Gust: 25 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!