नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गंगापूर-वैजापूर मार्गावर भीषण अपघात : कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक — एक ठार, एक गंभीर

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी गोकुळ नगराळे

साक्री : 07 नोव्हेंबर — गंगापूर-वैजापूर मार्गावर मांजरी पाटीजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
गंगापूरहून वैजापूरकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली (क्रमांक एमएच 19 पी 4412) ला कार (क्रमांक एमएच 20 बीएन 4545) ने पाठीमागून धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील नितीन रामा मारनर (वय 33, रा. कळंभीर, ता. साक्री, जि. धुळे) व पंकज आत्माराम बोरसे (वय 34, रा. कळंभीर, ता. साक्री) हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर तात्काळ रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी नितीन मारनर यांना तपासून मृत घोषित केले. तर, पंकज बोरसे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
📍 अपघात स्थळ: मांजरी पाटी, गंगापूर-वैजापूर मार्ग
🕗 वेळ: गुरुवार, रात्री सुमारे ८:०० वा.
🚗 संबंधित वाहने: ट्रॅक्टर (एमएच 19 पी 4412), कार (एमएच 20 बीएन 4545)

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!