नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हद्दपार असतानाही शहरात खुलेआम वावर; गांजाची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारासह दोघांना अटक – यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – राजेंद्र पवार

मिरज:- मिरज शहरात हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार पुन्हा शहरात प्रवेश करून खुलेआम गांजाची तस्करी करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत हद्दपार गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद (वय 27) आणि त्याचा साथीदार सोहेल लालूखान पठाण (वय 20, दोघे रा. कैकाडी गल्ली, मिरज) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 7 किलो 175 ग्रॅम गांजा, दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाल
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह सुशील मस्के, ऋतुराज होळकर आणि सुमीत सूर्यवंशी यांचे पथक मिरज परिसरात गस्तीवर होते. यावेळी म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरत असलेले दोघे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने तातडीने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.
हद्दपार असूनही मिरजेत प्रवेश कसा?
हुसेन सय्यद याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही तो मिरज शहरात प्रवेश करून गांजाची तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हद्दपार आदेशांचे उल्लंघन करून शहरात खुलेआम वावरणारा गुन्हेगार पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांजाची बाजारमूल्य सुमारे 2 लाख 15 हजार रुपये असून, दुचाकीची किंमत अंदाजे 1 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
हद्दपार गुन्हेगार पुन्हा शहरात येऊन बेकायदेशीर धंदा चालवित असल्याची बाब समोर आल्याने पोलिस यंत्रणेच्या देखरेखीवर आणि अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी हद्दपार आदेशांचे काटेकोर पालन आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुढील तपास सुरू
पोलिसांनी या तस्करीमागे कोणते जाळे कार्यरत आहे, गांजाचा पुरवठा कुठून केला जात होता आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू केला आहे. पुढील कारवाईत आणखी अटकेची शक्यता नाकारता येत नाही.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!