नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जुन्नर वनविभागाची धडक कारवाई : वनात आग लावणारे दोन आरोपी अटकेत….

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

पुणे:- जुन्नर तालुक्यातील खामगाव येथील राखीव वनक्षेत्रात आग लावून मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी वनविभागाने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी खामगाव वनकक्ष क्र. ४८ मधील शासकीय राखीव वनात काही व्यक्तींनी अतिक्रमण करून वनात आग लावल्याची घटना उघडकीस आली. या आगीत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र जळून गेले असून वृक्षसंपत्ती तसेच वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१)(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान अक्षय नामदेव खंडागळे व साईनाथ बाबू खंडागळे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रथम वर्ग न्यायालय, जुन्नर येथे हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वनविभागाने इशारा दिला आहे की, शासकीय राखीव वनात अतिक्रमण करणे किंवा वनात आग लावणे हा गंभीर गुन्हा असून दोषींना दोन वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारच्या घटनांवर पुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई वनसंरक्षक पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्या संयुक्त पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:45 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!