नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

४ लाखाची लाच घेताना पोलिस शिपायाला रंगेहाथ पकडले- कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाला ४ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलिस शिपायाने तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी पोलिस शिपायाने ७ लाखांपैकी पहिल्या टप्प्यात ४ लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे २ मार्च २०२६ रोजी गोकुळ शिरगाव परिसरात तक्रारदाराकडून ४ लाख रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने आरोपीला गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचा पोलिस शिपाई एजाज महंमद शेख त्याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने कारवाई केली. एक पोलिस शिपाई पदाच्या कर्मचाऱ्यांने इतक्या मोठ्या रक्कमेची मागणी केली असली तरी याच्या मागे कोणता अधिकारी आहे याचा तपास अधिकारी यांनी करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेमुळे लाचखोरीविरोधात एसीबीची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!