” नात्यातील सायकाॅलाॅजी चुकली,, डॉ पत्नी चे टोकाचे पाऊल,
DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या पत्नी व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला एकप्रकारे खळबळजनक वळण मिळाले आहे. याप्रकरणी पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होताच, ते अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘सिव्हिल’च्या मानसोपचार विभागप्रमुख महिलेची गंगापूर पोलीस चौकशी करण्याची शक्यता असून यामुळे सिव्हिल च्या वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकांच्या मनातील गुंता सोडवणे त्यांच्या प्रश्नाची अचुक उतर देत त्यांना जगण्याची उर्जा देत असा ज्यांचा पेशा, त्यांच्याच घरात संवादाऐवजी संशय आणि मानसिक छळाचा धूर निघत होता. ६ मार्च रोजी गंगापूर रोडवरील डीकेनगरात असलेल्या ‘रेवती ब्लू अपार्टमेंट’ मध्ये डॉ. मनीषा जेजुरकर यांनी जीवनयात्रा संपवली. सुरुवातीला ही घटना केवळ वैयक्तिक नैराश्यातून घडल्याचे वाटत होते, पण तपास चक्रांनी आता जाणीवपूर्वक मानसिक छळवणुकीचे गंभीर वास्तव समोर आणले आहे. धक्कादायक म्हणजे डॉ. निलेश यांची त्यांच्या वरिष्ठांशी असलेली जवळीक तसेच मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी वैभव थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉ. निलेश जेजुरकर हे घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्ट डॉ. महिलेस सांगत होते. इतकेच नव्हे तर, ते घरात स्वतःच्या पत्नीच्या मतापेक्षा या महिलेच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागत होते,” असा आरोप आहे. सन २०२१ पासून डॉ. निलेश यांनी पत्नी मनीषा यांच्याकडे दुर्लक्ष केले. या सततच्या मानसिक छळामुळे आणि पतीची परस्त्रीशी असलेल्या जवळीकीमुळे डॉ. मनीषा मानसिक तणावाखाली होत्या. याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक हर्षल आहिरराव करत आहेत.



