DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा
साक्री:- दि.०८/१२/२०२५ रोजीचे रात्री निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील देवजीपाडा गावातील राहणारे श्री.मुरलीधर बापु पाटील यांचे शेतातील पत्र्याच्या शेडमधुन त्यांचे मालकीची एम.एच.१८ टी.६१६५ टिव्हिएस सेंट्रा कंपनीची एकुण ५०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल चोरीस गेली होती त्याबाबत श्री. मुरलीधर बापु पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीता विरुध्द गुरनं ०५९/२०२६ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयात कोणताही सबळ पुरावा नसताना गुप्त बातमीव्दारे, सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांकडे केलेल्या तपासावरुन आरोपी नामे सचिन राजेंद्र सुर्यवंशी वय-२१ वर्षे रा. ठाणेपाडा ता. जि. नंदुरबार याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडुन चोरीस गेलेली एकुण ५०,०००/-रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा.डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. मयुर. भामरे, मसपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउनि/मधुकर सोमासे, पोउपनि/वाय. आर. भामरे, असई/कलीम शेख, पोहेकॉ नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ प्रशांत ठाकुर, पोहेकॉ प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/सागर कांगणे, पोकों/सुजीत देवरे, पोकॉ/शरद पाटील, चापोकॉ/मोहन माळी, पोकों/मुकेश दुरगुडे, यांचे पथकाने केली आहे.



