नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलिसांकडून ३ सराईत गुन्हेगार जेरबंद; १७.३४ लाखांच्या मुद्देमालासह ४ गुन्हे उघड.

सारंगखेडा पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार :- सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सारंगखेडा पोलिसांना मोठे यश आले आहे.

या कारवाईत मध्य प्रदेशातील ३ सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ३४ हजार ४९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या यशस्वी कामगिरीमुळे सारंगखेडा पोलीस ठाण्यातील घरफोडीचे ०४ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.

बोराळे गावातील घरफोडीनंतर तपास चक्र गतिमान
२९ मे २०२६ च्या रात्री सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील युवराज शंकर माळी आणि त्यांच्या शेजारी राहणारे किशोर भरत पाटील यांच्या घराचे मागचे दरवाजे तोडून अज्ञात चोरांनी ६,१५,२०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली होती.

याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (३) (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वी नांदरखेडा, फेस, आणि तोरखेडा परिसरातही अशाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.

संशयास्पद दुचाकीस्वाराने उघड केला गुन्ह्याचा मार्ग
१ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सारंगखेडा परिसरात गस्त घालत असताना, जयनगर गावाजवळ विना नंबरच्या युनिकॉर्न दुचाकीवर एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याची ओळख मिठाराम भावसिंग तडवी (वय ३४, रा. मुहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) अशी सांगितली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु सखोल चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारांसह परिसरात ४ ते ५ वेळा घरफोडी केल्याची कबुली दिली.

३ आरोपी अटकेत; १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मिठाराम तडवीच्या कबुलीनंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून त्याच्या इतर दोन साथीदारांनाही बेड्या ठोकल्या.

अटक केलेले आरोपी:
१. मिठाराम भावसिंग तडवी (वय ३४)
२. रतला मालसिंग तडवी

३. जगदीश प्रताप तडवी (सर्व रा. मुहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, म.प्र.)

जप्त केलेला मुद्देमाल:
सोने: ९९.६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत रु. १४,९४,१५०/-)

चांदी: चांदीचे दागिने (किंमत रु. १,३९,८९९/-)

दुचाकी: गुन्ह्यात वापरलेली विनानंबर युनिकॉर्न

मोटारसायकल (किंमत रु. १,००,०००/-)

एकूण जप्त माल: १७,३४,०४९ रुपये

सारंगखेडा पोलीस ठाण्यातील ‘हे’ ४ गुन्हे उघड

या टोळीकडून चौकशी दरम्यान सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:
गु.र.नं. ११०/२०२६
गु.र.नं. १२५/२०२६
गु.र.नं. १५७/२०२६
गु.र.नं. १६०/२०२६

कामगिरी करणारे पोलीस पथक
सदरची धडक कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
स्थानिक गुन्हे शाखा (LCB): पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि स्वप्नील वाळके, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सुनील येलवे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन वसावे, संजय रामोळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण आणि चेतन साळवे, पोलीस अंमलदार अभय राजपूत.

सारंगखेडा पोलीस ठाणे: सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बान्हे, पोलीस हवालदार मन्साराम पाटील, अंमलदार प्रवीण लोहार, वसंत मारनर.
मालमत्तेविरुद्ध तपास पथक: पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस अंमलदार इम्रान खाटीक, शिवदास पारधी, समाधान बोरसे, अनिल बढे, मधुकर वाडीले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:50 pm, June 8, 2026
40°C
साफ आकाश
21 %
39 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 6%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:10 pm
Translate »
error: Content is protected !!