🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अजगर भाई मुल्ला
मेहुणबारे : चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करून न्यायालयाने १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून केले अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी रात्री ९:०० ते २ जुलै २०२६ च्या मध्यरात्री १:०० वाजेच्या सुमारास खेडगाव येथील राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला ‘विकी आप्पा सोनवणे’ (रा. खेडगाव, ता. चाळीसगाव) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मेहुणबारे पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार आरोपी विकी सोनवणे याच्याविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) कलम १३७(२), ९६ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocities Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पोलीस कोठडी, तपास सुरू
गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ५ जुलै २०२६ रोजी अटक केली. ६ जुलै रोजी त्याला जळगाव येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहेत. सध्या परिसरात शांतता असून पोलीस गस्त (पेट्रोलिंग) सुरू आहे.



