नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बाप रे! RTO अधिकाऱ्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटा मोजताना मशीन गरम, सोनं पाहून डोळे फिरले!

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 

आग्रा :-  उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माजी एआरटीओ (ARTO) ललित कुमार यांच्या घरावर व्हिजिलन्स (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. या कारवाईत २२ किलो सोने-चांदी आणि १ कोटी ६२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान व्हिजिलन्सचे पथक आग्र्यातील अलिगंज परिसरातील चंद्रलोक कॉलनी येथील त्यांच्या आलिशान निवासस्थानी पोहोचले. झडतीदरम्यान घराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात सोन्याच्या व चांदीच्या विटा, दागिने आणि रोख रक्कम सापडली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या २२ किलो मौल्यवान धातूंमध्ये १३ किलो सोन्याच्या विटा व बिस्किटे तसेच ९ किलो चांदीच्या विटा व बार यांचा समावेश आहे. याशिवाय घराच्या विविध ठिकाणी लपवून ठेवलेली १.६२ कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
तपासात ललित कुमार यांनी आग्रा आणि इतर भागांत मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही समोर आले आहे. अलिगंजमधील आलिशान बंगल्यासह तेथील दोन प्लॉट, तसेच मोहनलालगंज व बालकगंज येथे प्रत्येकी एक प्लॉट आणि मोहनलालगंज परिसरात कोट्यवधी रुपयांची शेती जमीन असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
या सर्व मालमत्तेची बाजारमूल्ये कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिजिलन्स विभागाने जप्त केलेल्या मालमत्तेची पडताळणी सुरू असून, प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. संबंधित माजी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, बेहिशोबी संपत्तीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:15 am, July 19, 2026
27°C
घनघोर बादल
66 %
9 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!