नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वन विभागाच्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान वनपालासह तिघांवर हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट 

चंदगड :- चंदगड तालुक्यातील बांदराईवाडा येथे वन विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कथित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच भारतीय वन अधिनियम, 1927 अंतर्गत विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 13 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास वनपाल लुडदीना जॉन्सन डिसोजा या आपल्या पथकासह बांदराईवाडा येथे वन विभागाच्या अतिक्रमण हटाव कारवाईसाठी गेल्या होत्या. त्यावेळी काही जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली तसेच लोखंडी कोयता व दगडांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या हल्ल्यात वनपाल लुडदीना डिसोजा, वनसेवक मोहण तुपारे व राहुल दळवी हे जखमी झाले. तसेच वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी अलका लोखंडे यांनाही कोयत्याचा फटका बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी विमल विठ्ठल लांबोर, आरती विठ्ठल लांबोर, जनाबाई सुभाष लांबोर आणि लक्ष्मी सुभाष लांबोर (सर्व रा. बांदराईवाडा, ता. चंदगड) यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 233/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध गंभीर कलमांसह भारतीय वन अधिनियम, 1927 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चंदगड पोलीस करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:15 am, July 19, 2026
27°C
घनघोर बादल
66 %
9 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!