🚨DPT NEW🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी निवास गागडे
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व जुनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचा सर्वांगीण विकास, पालक–शिक्षक समन्वय आणि सकारात्मक संगोपन या विषयांवर या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते समुपदेशक प्रा. डॉ. जीवन पाटील यांनी विद्यार्थ्यांमधील वाढते शैक्षणिक आव्हान, मोबाईलचा योग्य वापर, अभ्यासातील सातत्य, पालकांची भूमिका आणि मुलांशी प्रभावी संवाद याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवून सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोळी बी. ए. होते. त्यांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून पर्यवेक्षिका सौ. पाटील आर. एस., इयत्ता आठवी (अ) चे वर्गशिक्षक श्री. मच्छिंद्र गोविंद आंबेकर तसेच इयत्ता आठवी (ब) च्या वर्गशिक्षिका सौ. खेडकर व्ही. टी. उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ. खेडकर व्ही. टी. यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच आभार प्रदर्शन श्री. मच्छिंद्र गोविंद आंबेकर यांनी केले.
सभेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली. पालक–शिक्षक समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही सभा अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरली.



