नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई: २ लाखांचा एम.डी. व डोडा जप्त, पंजाबचा आरोपी गजाआड

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी अकिल शहा 

साक्री धुळे :-  जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या रात्रीच्या गस्तीच्या आदेशानुसार साक्री पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडून मोठी कारवाई केली आहे. शेवाळी शिवारातील एका हॉटेलजवळून पंजाबच्या एका इसमाला सुमारे २,०३,०२५ रुपये किमतीच्या एम.डी. (मेफेड्रॉन) आणि डोडा (पॉपी स्ट्रॉ) या अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीवरून टाकली रेड

दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, शेवाळी ता. साक्री शिवारातील एच. पी. पेट्रोल पंपाजवळील ‘हॉटेल सतलोज’ येथे एक इसम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगून आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून हॉटेल परिसरात छापा टाकला.

पोलिसांना पाहून संशयित हालचाली

पोलीस पथकाला पाहताच हॉटेलजवळील एका इसमाने संशयीतरित्या हालचाली करून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला जागीच पकडून विचारपूस केली असता, त्याने आपले नाव राजकुमार मुल्कराज वाल्मीकी (वय ४२, रा. मुक्तासर रोड, फरीदकोट, पंजाब; सध्या रा. फिरोजपूर छावणी, पंजाब) असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून २,०३,०२५ रुपये किमतीचा एम.डी. व डोडा हा साठा जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल

मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी आरोपी राजकुमार वाल्मीकी याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये अधिनियम (NDPS Act – १९८५) कलम ८(क), १५(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २३२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही धडाकेबाज कामगिरी धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्रीचे पो.नि. दीपक वळवी, स.पो.नि. संतोष मुढे, पो.उ.नि. प्रसाद रौंदळ, अशोक वळवी, राहुल बांगर, तसेच अंमलदार संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील, अनिल शिंदे, संतोष मोरे, तुषार जाधव, मयुर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, मंगेश खैरनार आणि म.पो.अं. नम्रता मगर यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 am, August 7, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
24 Km/h
Wind Gust: 46 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:06 am
Sunset: 7:06 pm
Translate »
error: Content is protected !!