नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चिवटीबारी ठरतेय पर्यटकांची पसंती; निसर्गरम्य वातावरण आणि मनमोहक दृश्यांनी पर्यटकांची वाढतेय गर्दी.

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री :  साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेला चिवटीबारी (गायका) धबधबा सुमारे २५० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या नयनरम्य जलप्रपातामुळे व निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांच्या आकर्षण केंद्र बनला आहे. पावसाळ्यात हा परिसरहिरवेगार आणि फुलून निघाला असून नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

साक्री शहरापासून अवघ्या ५० कि.मी अंतरावर असलेल्या व कुडाशी गावापासून अवघ्या १२ ते १३ कि.मी.अंतरावर असलेल्या चिवटीबारी येथील गायका डोंगरावरून २५० फूट उंचावरून खाली पडणारा पांढराशुभ्र धबधबा आकर्षित केंद्र बनले असून मान्सूनमध्ये चिवटीबारीची ही वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे.

साक्री विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मजुळाताई गावीत यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या छोट्या झोपड्या व आकर्षक कमान मोहून घेत आहे.

नॉन व्हेज खवय्यासाठी खास खड्डा कोंबडी पसंती ठरत आहे.

चिवटीबारी या पर्यटन केंद्राचा विकास झाल्यास प्रती सापुतारा सारखी प्रगती होवू शकते कारण या ठिकाणी ही सापुतारा सारखेच रोप वे साठी स्थान आहे डोंगरावर सपाटी असल्याने त्या ठिकाणीं गार्डन बनू शकते तसेच बोटिंग करण्यासाठीं तलाव ही आहे भविष्यात रोपवे व कुटुंबासह नौका विहाराचा आनंद घेण्यासाठी बोटींग स्थान निर्माण झाल्यास चिवटीबारी प्रती सापुतारा म्हटलें तरी वावगे ठरणार नाही.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:56 am, August 17, 2026
27°C
घनघोर बादल
70 %
16 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!