नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर पोलिसांची मोठी कारवाई: सोलर कंपनीतून कॉपर केबल चोरणारी टोळी गजाआड, ₹१.०६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी साकिब सय्यद

साक्री: सोलर कंपनीतून कॉपर केबलची चोरी करणाऱ्या एका टोळीचा निजामपूर पोलिसांनी छडा लावला असून तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेली केबल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इन्व्हर्टरची तोडफोड करून केली होती चोरी१६ जुलै २०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडगाव शिवारात ही घटना घडली होती. येथील ‘ह्युबोन (फोर पार्टनर) सोलर कंपनी’च्या आय.सी.आर. इन्व्हर्टरमधून अज्ञात चोरांनी तोडफोड केली होती. चोरांनी कंपनीतून ८६ हजार रुपये किमतीची ६ Sq.mm ची एकूण ४३,००० मीटर कॉपर केबल वायर चोरून नेली होती. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५१/२०२६ BNS कलम ३०३(२), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गजाआडया गुन्ह्याचा तपास करत असताना १६ ऑगस्ट २०२६ रोजी निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. किरण बर्गे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भडगाव (ता. साक्री) येथील तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.अटक करण्यात आलेले आरोपी:१) सोनू तात्या पवार (वय २० वर्षे, रा. भडगाव)२) लखन देविदास सोनवणे (वय २६ वर्षे, रा. भडगाव)३) अनिल भावराव ठाकरे (वय २२ वर्षे, रा. भडगाव)लाखाचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरी गेलेली ८६,००० रुपयांची कॉपर केबल आणि चोरीसाठी वापरलेली २०,००0 रुपये किमतीची मोटरसायकल (क्रमांक MH-18/BK-8106) असा एकूण १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस पथकाची कामगिरीसदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. किरण बर्गे, सपोनि. प्रियदर्शनी थोरात, पोउनि. भूषण शेवाळे, प्र.पोउनि. शिवराज आंधळे तसेच पोलीस अंमलदार नारायण माळचे, रतन मोरे, प्रशांत ठाकूर, प्रदिप आखाडे, खंडेराव पवार, परमेश्वर चव्हाण आणि इतर पोलीस सहकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:52 am, August 23, 2026
26°C
घनघोर बादल
73 %
12 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!